Tuesday, 25 October 2011

मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?

मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?
हो हो लोणच्यासारखी।
मुरत जाते, जुनी झाली की।

मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?
हो हो सायीसारखी।
घट्ट होते वेळ जा‌ईल तशी।

मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?
हो हो बासुंदीसारखी, गोडी वाढते आटवाल तशी।

मैत्री असते कशी, फोडणीसारखी?
हो हो फोडणीसारखी। लज्जत येते जीवनाला तडतडली तरी।

मैत्री असते कशी, मीठासारखी?
हो हो मीठासारखी। . . .
नसेल तर हो‌ईल जीवन अळणी............

No comments:

Post a Comment