Saturday, 12 November 2011

मी पण ठरवलंय .... नाय बोलायचा तिच्या वांगडा

एकदा माझ्या आणि तिच्यात
शुल्लकसा भांडण झाला,
मी पण ठरवलंय ....
नाय बोलायचा तिच्या वांगडा
एक दिस गेलो,दुसरो गेलो,
पण उलटाच झाला
भेटान सारख्या वाटाक लागला
हूर हूर वाढली,,मन कशात लागा नाय
जैसर जैसर भेटलव थयसर जावन इलंय
नदीवर बघलंय ,,,शाळेच्या बाजूक बघलंय
पण नाय तीचो पत्तोच नाय रे...
माका वाटला ता खय पावण्याकडे गेला कि काय
दोस्ताकडे चौकशी केलंय
समजला गावातच आसा.....आणखीन ठोके वाडाक लागले,,
मग दुसऱ्या दिवसाक, माझो येळ बदललंय
तेका शोधुचो........
तेव्हा माका समाजला...कि ता पण माका तसाच ..
दर रोज ...शोधत होता ..पण चुका मूक होत होती
आता तुम्हीच सांगा ....
हेकाच पिरेम बिरेम म्हणतत काय हो...???

No comments:

Post a Comment