Friday, 4 November 2011

खरंच खूप आवडतं मला ... जेव्हा तू माझी आतुरतेने वाट बघतोस

खरंच खूप आवडतं मला ...
जेव्हा तू माझी आतुरतेने वाट बघतोस
मग मी विचारते ... सांग ना का वाट बघतोस अशी ?
तेव्हा तू म्हणतोस " कारण तू आवडतेस मला "
तुझे हे चार शब्दच माझ्यासाठी सर्व काही असतात
दुःखाच्या क्षणांमधे ही जे मनाला दिलासा देतात
त्या क्षणी खरोखर लाखो आनंद-लहरी उमटतात मनात
हेच शब्द आयुष्याच्या खडतर वाटेवर जगण्याचं बळ देतात
म्हणून पुन्हा एकदा म्हणशील का ?
" कारण तू आवडतेस मला "
पुन्हा एकदा ....
पुन्हा एकदा .

No comments:

Post a Comment