Wednesday, 23 November 2011

काळापासून भेटलेल्या घावांचे प्रत्यूत्तर आहे मैत्री.

काळापासून भेटलेल्या घावांचे
प्रत्यूत्तर आहे मैत्री.

गाण्याची लय,सुरांमधली तान
आणि कवितेतले मधूर शब्द
आहे मैत्री.

हवेमधला गारवा आणि
अडचणीँमधील विसावा आहे मैत्री.

काळाची थांबलेली पाउले आणि न विसरता येणारी आठवण आहे मैत्री.

आठवणीँच्या पाऊलखूणा आणि
सुख-दु:खांची सांगड आहे मैत्री.

व्याख्याहि कमी पडतील सांगयला असे एक अतूट नाते आहे मैत्री.

तरिही पुन्हा-पुन्हा मनात प्रश्न येतो कि खरच
काय आहे मैत्री?

No comments:

Post a Comment