Monday, 14 November 2011

मिलन केव्हा होणे ..... मनात खूप चलबिचल आहे

मिलन केव्हा होणे .....
मनात खूप चलबिचल आहे
सांगू कसे मी मनातले सारे

तुजविना राहणे असह्य झाले
प्रेमाचे गुज तुजला सांगू कसे

झुरणे हे नेहमीचेच आता असे
दिवस जाने आज कठीण वाटे

अबोल प्रेम वदने जमत नसे
पाठवू कश्या भावना तुज कडे

नजरेचाच संवाद चालूच आहे
पण हृदयाचे मिलन केव्हा होणे ..

No comments:

Post a Comment