हा दुरावा आता सहन नाही होत रे
विसरलास का सारे वादे?
का तोडलेस माझी सारी स्वप्ने?
जर प्रेम करणे अशक्य होते तुला?
तर का लावला इतका जीव मला?
सोडूनच मला जायचं होत तर
ह्या अनमोल आठवणी का दिल्यास ?
तोडून मनाला जायचं होत तर
वेड्यासारखं प्रेम का केलस ?
म्हणाला होतास ना
शेवट पर्यंत साथ देईल ?
मग हा विरह का,
का दिलास मजला ?
आशा हि सोडूनी दिली आहे
आता तुझ्या परतण्याची
पण हा एकांत मला जणू खात आहे
मनाला आस आहे तुझ्या येण्याची.........!!
No comments:
Post a Comment