Thursday, 1 December 2011

वार्‍यासंगे पदर तुझा हळुवार उडत होता..... भिरभिरणारा वारा सुध्दा त्याच्या कुशीत शिरत होता.....

वार्‍यासंगे पदर तुझा
हळुवार उडत होता.....
भिरभिरणारा वारा सुध्दा
त्याच्या कुशीत शिरत होता.....

कधी पदरास झटका देई
तर कधी प्रेमाने विळखा घाली.....
अल्लड वार्‍याचा हा खेळ
तुला मात्र उमगलाच नाही.....

उडणारा पदर तुझा
मन माझे भुलवत होता.....
नाना स्वप्ने मनी पालवत
प्रेमाचे तरंग फुलवित होता.....

साद घालिते मन माझे
प्रितीचे हे फुल कोवळे.....
अलगद उमले हृदयप्रीत ही
अबोल मनीचे भाव बोलके.....

No comments:

Post a Comment