Friday, 2 December 2011

एके दिवशी यमदुत गण्याचे प्राण हरण करण्यासाठी आला..

एके दिवशी यमदुत गण्याचे प्राण हरण करण्यासाठी आला..
गण्या : पण मी तुझ्याबरोबर यायला अजिबात तयार नाही..
यमदुत: पण तुझे नाव माझ्या लिस्ट मधे सगळ्यात वरती पहिले आहे.
मला तुला न्याव्हेच लागेल... गण्या : मग माझी एक अट पूर्ण कर...तू आता माझ्या बरोबर काहीतरी खाऊन घे...मग आपण निघू... यमदुत: ठीक आहे...
गण्या ने यमदुताच्या जेवणात गुंगीचे(झोपेचे) औषध मिसळले...
जेवण झाल्यावर यमदुत काही वेळ झोपी गेला.... तोपर्यंत गण्याने यमदुताच्या लिस्ट मधील त्याचे पहिले नाव खोडून सगळ्यात शेवटी लिहिले... यमदुत मस्त झोपेतून उठल्यावर खुश होऊन गण्याला म्हणाला
मी तुझ्यावर खूप खुश आहे.. त्यासाठी आता मी माझ्या लिस्टमधून सगळ्यात शेवटी असलेल्या
व्यक्तीला नेतो....
मोरल : मृत्यू कोणालाही चुकत नाही, जे विधी लिखीत आहे, ते घडतेच..

No comments:

Post a Comment