Wednesday, 7 December 2011

ती : माझ्यात काय आवडतं? तो : तुझं स्वतःचं असं काहीच नाही आवडत मला....पण "तुझ्या मनातला मी" आवडतो मला...

ती : माझ्यात काय आवडतं?
तो : तुझं स्वतःचं असं काहीच नाही आवडत मला....पण "तुझ्या मनातला मी" आवडतो मला...
ती : किती प्रेम करतोस माझ्यावर???
तो : हे माझ्या हातातलं हिरवं पान दिसतंय? त्या पानावर जितक्या हिरव्या शिरा आहेत न तितकंच प्रेम करतो. जास्त नाही.
ती : मला कधी विसरशील?
... तो : एकदम सहज विसरेन....हा आकाशातला सूर्य उगवायचा थांबला ना कि विसरेन.
ती : कधी आठवशील मला?
तो : आठवण सारखी सारखी का काढू ? कधी तरीच काढेन... पापण्यांची उघडझाप करतील ना तेव्हाच काढेन.
ती : तुझ्या सोबत राहिल्याने मला काही तोटा होईल का?
तो : तोटा तर आहेच...माझ्या सोबत राहिलीस तर तुला तुझं दु:ख कधीच एकटीला अनुभवता येणार
नाही. त्यात अर्धा हिस्सा नेहमी तुला माझ्यासाठी काढून ठेवावा लागेल.
ती : माझ्या कोणत्या गोष्टीवर तूझा सर्वात जास्त हक्क आहे?
तो : तुझ्या जगण्यावर नसेल माझा हक्क पण...तू माझ्याशिवाय एकटी हे जग सोडून जाऊ नाही शकणार..
सगळं ऐकून आभाळातल्या उगवत्या सुर्याखाली हातात पान घेतलेल्या पापण्यांची उघडझाप करणाऱ्या
त्याला पाहताना तिच्या डोळ्यात फक्त पाणीच होते.
तो क्षण काय होता...याचं उत्तर दोघांकडेही नव्हतं...
पण तो क्षण शिंपल्यातल्या मोत्यासारखा होता.... मनात भरणारा..

No comments:

Post a Comment