कितीही म्हटलं तरी,
मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही..,
आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं,
या चातकाला व्याज मागता येत नाही.
कितीही ठरवलं,
तरी तुझ्यावर रुसून राहता येत नाही...,
उघड्या डोळ्यांनी तूला टाळलं,
तरी मिटल्यावर त्यांना तुझ्याशिवाय पर्याय उरत नाही.
No comments:
Post a Comment