Thursday, 1 December 2011

नशीबवान तर सगळेच असतात नशीबाला बदलणारा एखादाच असतो...

नशीबवान तर सगळेच असतात
नशीबाला बदलणारा एखादाच असतो...
हसतमुख तर सगळेच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो...
मर्त्य तर सगळेच असतात
कर्तुत्ववान अमर एखादाच असतो...
चमकणारे कजवे बरेच असतात
प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो...
सुखचे सोबती सर्वच असतात
दुःखचा साथीदार एखादाच असतो.....
अनुभवाने शहाणे बरेच असतात
अनुभवालाही शाहाणा करणारा एखादाच असतो...
जाळणारे बरेच असतात
मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो ..

No comments:

Post a Comment