Sunday, 18 December 2011

नेमकं असं होतं रोज तुझी आठवण आली, कि फोन करु वाटतो,

नेमकं असं होतं
रोज तुझी आठवण आली,
कि फोन करु वाटतो,
नंतर कळतं कि,
आता फोन तुझ्याजवळ नसतो!
कधी तु फोन करतेस,
अन् मी recieve करत नाही,
फोन silent वर असतो,
मला आवाजच येत नाही!
कधी अचानक तुझा फोन येतो,
मी हि recieve करतो,
प्रेमालाप रंगत असताना,
अचानक balence च संपतो!
कधी मूड मस्त असतो,
balence जबरदस्त असतो,
नेमकं त्याच क्षणी,
तुझा father तिथे असतो!
भले, असशील दुर,
मला दुर तु नाही,
करमतं का तुला गं ?
मला खरंच करमत नाही!......

marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

सकाळ "म्हणजे फक्त सुर्योदय नसते.

सकाळ "म्हणजे फक्त सुर्योदय नसते.
ती एक देवाची सुंदर कलाक्रुती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतों.
आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते.
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरवात असते.
... !! शुभ प्रभात !!



marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

थोडा वेळ नाचल्यावर मोर सुध्दा निघुन जातात,

थोडा वेळ नाचल्यावर मोर सुध्दा निघुन जातात,

त्याँच्या नकळत काही पिसं जागो जागी पडून राहतात,

असेच आयुष्यात काही माणसं काही क्षणच येऊन जातात,

स्वप्नाच्या वाटेवरती पाऊलखूणा ठेऊन जातात. -



marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

तू हो म्हणाली असतीस तर सारेच प्रश्न सोडवले असते,


तू हो म्हणाली असतीस तर सारेच प्रश्न सोडवले असते,
जीवनात प्रत्येक शर्यत हरत आलोय,
कदाचित प्रेमात तरी जिंकलो असतो,
तुझ्या होकाराने एका नविन आयुष्याची सुरवात केली असती,
तुझ्या नुसत्या हो म्हनन्याने मी हवेला देखिल मुठीत बांधले असते,
मुमताजच्या प्रेमासाठी शाहजानाने जमिनीवर ताजमहल बांधला होता, तू जर मला साथ दिली असतीस तर मी हवेत असे कित्येक ताज बांधले असते,

मी जेथे तुला माझ्या प्रेमाची मागणी घातली होती,
त्याच मंदिरात जेव्हा आपण भेटलो होतो,
तेव्हा तुझा हात कुनाच्यातरी हातात होता,
मी मात्र तुझाच हात नव्याने शोधत होतो....

तेव्हा तुझ्या नजरेने नकळत प्रश्न केला होता,
आणखी तुला कोणी भेटलेच नाही,
पण तुला कसा सांगू तुझ्या जाण्याने कोणी भेटण्याची आशा राहिलीच नाही..

marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

Saturday, 17 December 2011

प्रेम रोगाची लक्षणे-

प्रेम रोगाची लक्षणे-

हे सर्व ‘कळत नकळत’च घडत असल्याने ह्या रोगाची अशी विशिष्ट लक्षणे नाहीत. परंतु, सामान्यतः खालील गोष्टी ह्या रोगाच्या बळी पडलेल्या व्यक्तीला होतात.

* विशिष्ट एका व्यक्तीच्या असण्याने/दिसण्याने/संपर्कात आल्याने अचानक प्रफुल्लीत होणे.
* ती विशिष्ट व्यक्ती सोडून दुसरे कोणीच व्यक्ती आपलेसे न वाटणे.
* सतत त्याच एका व्यक्तीबद्दल प्रेमभाव निर्माण होणे.
* व्यक्ती समोर आल्यावर धडधड वाढणे, घाम फुटणे, जीव कावरा बावरा होणे.
* त्या व्यक्तीसमोर काहीच बोलता न येणे.
* परंतु त्याच व्यक्तीसमोर सतत जाण्याची अथवा व्यक्तीच्या संपर्कात राहण्याची इच्छा होणे.
* सतत त्याच व्यक्तीचे विचार येत राहणे. त्यामुळे व्यवस्थित झोपही न येणे. अथवा झोपेत त्याच
व्यक्तीबद्दल स्वप्न पडणे.
* मित्र/मैत्रिणी सोबत असतांना देखील एकटेपणा वाटणे.
* त्या व्यक्तीबद्दलच गप्पा माराव्या वाटणे.
* सर्व ठिकाणी त्या विशिष्ट व्यक्तीचा आभास होणे.



marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही,

...तुझी आठवण.....

तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही,
तू म्हणतेस कविता कर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही.
डोळ्यांसमोर सारखे तुझे़च चित्र
तूच दिसते सर्व जागी
अशी फीलिंग विचित्र,
तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत नाही,
तुझी आठवण आल्यावर मला काहीच सुचत नाही.
खुप गोड़ हसतेस तू,
खुप गोड़ लाजतेस,
प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक वाजते,
बोलायच असत खुप काही पण ओठ हालत नाही,
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही.
खरच.. ...
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही.



marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील तुला माझी आठवण होईल तुझ्याही डोळयांत तेव्हा माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!



marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak