Friday, 21 October 2011

निबंध हा एक लेखनाचा प्रकार आहे, निबंधात सुध्धा २ प्रकार असतात.






निबंध हा एक लेखनाचा प्रकार आहे, निबंधात सुध्धा २ प्रकार असतात.
प्रकार पहिला:- स्वतः लिहिलेले निबंध.
प्रकार दुसरा:- दुसऱ्याचा पाहून लिहिलेला निबंध.

मी शाळेत असताना खूप निबंध लिहीयचो, निबंध लिहिल्याने पेनातील रिफील लवकर रिफील करायला लागायची, तशी माझी पेट्रोल टाकी पण हल्ली रोज रिफील करावी लागती, पेट्रोल सध्या खूप महाग झाले आहे असे लोक ओरडतात, लोक तर बोंब स्फोट झाला कि सुद्धा ओरडतात, बोंब स्फोट झाला कि जखमींना सरकार आर्थिक मदत देणार असते, आर्थिक हिशोब माझे कायम चुकतात, आजकाल चुका सुध्धा लोखंड आणि जास्त पासून बनवितात. लोखंडी तवा मध्ये केलेला स्वयंपाक शरीराला चांगला असतो, शरीर हे हे मेदापासून बनलेले असते, डुकराच्या मेदा पासून सुध्धा तूप करता येते, दुकारामुळे स्वाईन फ्लू ची मागे एकदा लाट आली होती, तेव्हा मी पण मास्क वापरायचो, मास्क हा खूप चांगला पिक्चर होता, मला पिक्चर खूप आवडतात. मी वेड्न्स्डे हा पिक्चर खूप वेळा बघितला आहे, वेड्न्स्डे म्हणजे बुधवार, हा दिवस कन्या राशीला शुभ असतो असे म्हणतात, कन्या मी शोधात आहे लग्नासाठी, लग्नात खूप धमाल येते, धमाल मध्ये संजय दत्त आहे, संजय दत्त चा नाम फिल्म मस्त च होता, अखंड नामाचा जप आपण गणपतीत सुध्धा करतो किंवा मठात सुध्धा करतो, शाळेत असताना आम्हाला कायम गणपती बाप्पावर निबंध लिहीयाला सांगायचे,
आता बास करा तुम्ही हे सगळे वाचन, मला काही काम धंदा नाही, तुम्हाला आहे कि नाही....

No comments:

Post a Comment